चला शिकूया जगण्याची कला
।। चला, शिकु या जगण्याची कला। (1) मानव आपल्या संपूर्ण आयुष्यात सुखाचीच अपेक्षा करतो व सुखाच्या पाठी मागे धाव धाव धावतो. कधी कधी त्याची दमछाक होते हे सुख तो भौतिक वस्तुतच शोधत बसतो. गाडी, बंगला, पैसा ,पद ,प्रतिष्ठा यासारख्या वस्तूत.. गोष्टीत तो सुख शोधत असतो.वैभवात लोळणाऱ्या माणसाला जरी विचारलं तरी तो म्हणेल,"वैभव आहे रे, पण मनाला शांतता नाही". एकूणच काय माणसाला हव असलेल सुख त्याला वस्तुत, वास्तूत मिळणारच नाही. ह्या बाह्य वस्तुत तो सुख शोधु लागतो.सुख अशा बाह्यवस्तुतुन मिळतच नसत.तर ते अंतकरणात बसलेल्या त्या परमेश्वराचे ध्यान करण्याने मिळते. अंतरीचे सुख हेच खरं असतं यावर ठाम राहणे यामुळेच सुख मिळत असतं.अंंतरिच सुखच खरं सुख असतं, हे माहीत असूनही "कळतं पण वळत नाही" या म्हणीप्रमाणे क्षणभर आपणास पुन्हा आपण सुखाच्या मागे धावत राहतो पण सुखाची संकल्पना आपण समजूनच घेत नाही. आपणास असल्याच्या सुखापेक्षा नसल्याचे दुःख जास्त होतं. आपणाकडे 99 रुपये असतात पण आपल्याला शंभर रुपयाची गरज असते आपल्याला rs.99 असल्याचं आनंद वाटत नाही एक रुपया नसल्य...