पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
🌱💎🌱💎🌱💎🌱💎🌱💎🌱💎🌱     💎मन के जीते जीत है 💎                  (भाग-3)   मागील भागात आपण समारोपाला दृष्टिकोन संदर्भात विचार केला होता. प्रत्येकाच्या दृष्टीप्रमाणे घटनेचा अन्वयार्थ बदलत असतो तो कसा एक प्रसंग पाहूया....      तिघे मित्र दररोज सकाळी पायी फिरण्यासाठी जात असत. या तिघांना एकदा सकाळी सकाळी एका झाडाखाली एक व्यक्ती चिंतनात बसल्यासारखी दिसली.तिला पाहून पहिला मित्र म्हणाला,"बहुतेक हा रात्री खूप दारू प्यायलेला असणार. अद्याप या माणसाची उतरलेली दिसत नाही.दुसरा त्यावर लगेच म्हणाला," अरे,तो प्यायलेला वाटत नाही.चोर वाटतो.बहुदा रात्री चोरी केली असणार ते डबोल इथं पुरून राखण करीत बसला असणार.या दोघांचे म्हणणे ऐकल्यावर तिसरा मित्र म्हणाला,"काहीतरीच काय बोलतोस, सकाळची प्रसन्न शांत व निवांत वेळ आहे. अशा वेळी तो मनुष्य डोळे मिटून परमेश्वराचे स्मरण करीत असावा.घटना एकच प्रत्येक घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. प्रत्येकाच्या दृष्टी प्रमाणेच घटनेचा अन्वयार्थ बदलत असतो.     ...
' 💎l🐾💎🐾💎🐾💎🐾💎🐾💎🐾💎🐾💎 ✍🏻      🌱 मन के हारे हार है ...🌱 ------*-----*-----*-----*-----*-----*-----*----*-----*-----*              भाग-2 मागील भागात आपण मनाला वळण लावण्यासंबधी विचार केला.ते कस लावाव यासंबधी आपण या भागात विचार करु या...    माळी अथवा शेतकरी जसे आपल्या मळ्यात चांगल उत्कृष्ट बीज पेरणी करत असतो.त्याचप्रमाणे आपणही आपल्या मनाच्या शेतात उत्कृष्ट बीज पेरणी करावी.तथागतांनी प्रकृतीचे तीन नियम सांगताना म्हटलय,आपल्या सुपीक शेतात बी पेरले नाही तर,निसर्ग अशी शेती तृण व घास, गवताने भरुन टाकतो. अगदी त्यासमच लहानपणापासुनच आपण आपल्या मनाच्या शेतात सकारात्मक विचार भरले नाहीत तर,नकारात्मक विचारांच तण आपोआप तयार होत.एवढच नव्हेतर,सफलता अन निष्फलता या दोघांचही जन्मस्थान मानवी मनच असत.जो जसा विचार करतो,तशीच त्याला फलनिष्पत्ती मिळत असते. जो नेहमीच सफलतेचा विचार करतो, त्याला सफलता मिळते. निष्फलतेचा,अपयशाचा विचार करणार्य्याला सर्वत्र निष्फलता मिळते.'जसा विचार तसे परिणाम'हा प्रकृतीचा हा नियमच त्याच बरोबर चुंबक जस लो...
इमेज
🌱🏵🌱🏵🌱🏵⬜🏵🌱🏵⬜ 🏵   मन के जीते जीत 🏵                              भाग एक ------------------------------------------------------    जीवन मे कुछ करना है तो,    मन को मारे मत बैठो।    आगे आगे बढना है तो,     हिम्मत हारे मत बैठो।।        गोव्याच्या राजधानीत पणजी येथे भारतीय किसान संघा च्या प्रांत अधिवेशनात हे गीत आम्ही तीन दिवस मनामनात रुजवलं.जेंव्हा जेंव्हा,मन हताश होतं,निराश होतं.तेंव्हा तेंव्हा हे गीत सहजच ओठावर येते.गीत कुणाचं हे ठाऊक नाही.पण या गीताचा आशय मात्र मरगळलेल्या मनाला आशेची नवपालवी देऊन जाते.जो चालतो,त्याला इच्छित ठिकाणी जाता येते.बसुन "देरे हरी पलंगावरी"म्हणणार्य्याला मात्र आपलं इच्छित ठिकाण ,इच्छित ध्येय गाठताच येत नाही.म्हणतात ना,पायान चालणारी अंतर गाठतात.डोक्यान चालणारी ध्येय गाठतात.काहीच न करता नुसत बसुन काथ्याकुट करणारी माणसं आपल्याच माणसांनाही ओझ बनतात.नुसत पाय पसरुन बसल्याने,भाग्य उजळतच नसते.चालणार्य्यान...