राष्ट्रीय कन्या दिवस
🚩🌼🚩🌼🚩🌼🚩🌼🚩🌼🚩🌼 ————||राष्ट्रीय कन्या दिवस ||————————➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः । यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ।। ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा होते तेथे देवता निवास करतात. ज्या ठिकाणी स्त्रियांचा तिरस्कार केला जातो, सन्मान होत नाही. तेथे देवता थांबत सुद्धा नाहीत. त्यामुळे कुठलेही सहकार्य त्याठिकाणी होत नसते. कुठलेही सत्कार्य त्या ठिकाणी होत नसतं.चांगली फलदायी कामे होत नाहीत. आधुनिक काळात महिलांचा सन्मान करण्यासाठी मदर्स डे साजरा केला जातो. भारतात हजारो वर्षापासून मातृ पूजन,कन्या पूजन करण्याची हिंदू परंपरा अस्तित्वात आहे. असे असले तरी, दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी हा दिवस कन्या दिवस म्हणून साजरा करण्याची आपली राष्ट्रीय परंपरा आहे. याशिवाय जगभरात 11 ऑक्टोबर रोजी 'जागतिक कन्या दिन' साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे, मुलींचा स...