एक दिवा आपणही होवु या....
🕯️💥🕯️🎇 एक दिवा आपणही होऊया..🕯️🎇 💥 ➖💥➖➖💥➖💥➖💥➖💥➖💥➖ ➖💥➖💥 जैसी दीपकळी धाकुटी।परी बहु तेजातें प्रगटी तैसी सदबुद्धी हे थेकुटी म्हणो नये।। दिपावलीच्या सणानिमित्ताने ज्ञानेश्वरीतील ही ओवी सहज आठवली.बुद्धियोग आणि कर्मयोग यांचं महत्त्व समजावून सांगताना कुरुक्षेत्रावर क्षत्रिय धर्माचे ज्ञान सांगितल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेशिताना म्हटल, सुदबुद्धीच्या ठायी पापपुण्याचा प्रवेश होत नसतो.या कारणाने सत्वादी त्रिगुणांचा तिला स्पर्शही होत नाही. हा योग म्हणजेच कर्मयोग! माऊली या ओवीत म्हणतात,ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान असली तरी,प्रकाश मात्र भरपूर देते.त्याचप्रमाणे ही सदबुद्गी ही आत्मप्रकाश देणारी असते.दगडाप्रमाणे परीस जसा स...