🚩 महाराष्ट्राला पडलेल स्वराज्याच स्वप्न... राजमाता,राष्ट्रमाता जिजाउ ....
🚩 महाराष्ट्राला पडलेल स्वराज्याच स्वप्न... राजमाता,राष्ट्रमाता जिजाउ .... ⚜️🌱⚜️🌱⚜️🌱⚜️🌱⚜️🌱⚜️🌱⚜️🌱⚜️🌱⚜️🌱 १२ जानेवारी२०२१ जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते झाले शिवरायनी शंभू छावा…! जिजाऊ तुम्ही नसता तर, नसता मिळाला स्वराज्य ठेवा…! जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते लढले मावळे…! जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते दिसले विजयाचे सोहळे…! आज दि.१२जानेवारीचा योगायोग म्हणजे,आज राष्ट्रमाता जिजाउ व आपल्या विद्गतेची व धर्मध्वजा सातासमुद्रापलीकडे नेउन भारतमातेच मान उंचावणारे विवेकानंद यांचाही जन्मदिन! या दुग्धशर्करा योगाच्या सर्वांना शुभेच्छा...जय जिजाउ!! भगवान श्रीकुष्णाचे वंशज असलेल्या देवगिरीचे सम्राट यादवरावांच्या घराण्यामधील पाच हजारी मनसबदार लखुजी जाधवआणि म्हाळसाबाई यांच्या पोटी स्वराज्याची माता म्हणजे ,राजमाता जिजाऊ हे कन्यारत्न १२जानेवारी १५९८ रोजी सिंदखेड राजा जन्मले. हे गाव आजच्या बुलढाणा जिल्ह्यात येत.त्यांना चार मोठे भाऊ होते.माहेरी त्यांनी राजनीती,युद्धकल...