।।तुका आकाशाएवढा ।।
‘♾️❄️♾️❄️♾️❄️♾️❄️♾️❄️♾️❄️♾️❄️♾️❄️♾️❄️♾️✍🏻 ।। तुका आकाशाएवढा’ ।। दि.३०मार्च२०२१ अणु-रेणु या थोकडा । तुका आकाशाएवढा।’ फाल्गुन वद्य द्वितीया अर्थात तुकाराम बीज हा संत तुकाराम महाराजांचा सदेह वैकुंठगमन दिवस. या पवित्र दिवसाचे औचित्य म्हणून जगभरातले वारकरी जगतगुरु संत तुकाराम महाराज यांची आज 'बीज'म्हणुन साजरी करतात. तुकोबांच वैकुंठागमन असही वारकरी म्हणतात. अगदी खरय!खरतर तुकोबावर लिहायलाही अधिकारी असाव लागत. 'तिथे पाहीजे जातीचे,येरागबाळ्याचे काम नोहे..'अणु-रेणूपेक्षाही सूक्ष्म आणि आकाशाएवढ्या मोठ्या तुकोबांवर हा येरागबाळा लिहतोय. ‘तुका आकाशाएवढा’ ‘अणु-रेणु या थोकडा। तुका आकाशाएवढा।’ हा अभंग असा अभंगही तुकोबांचाच. या सृष्टीमधील अणु-रेणुमध्ये ईश्वरी चैतन्य शक्ती,अति सूक्ष्म असून,संपूर्ण ब्रम्हांडामधील घटकात तिच अस्तित्व आकाशापेक्षाही मोठे आहे.ही चैतन्यशक्ती प्रत्येक माणसात असल्याचे तुकोबा स्पष्ट करतात. वारकर...