पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कृषी व विजयाच्या संस्कृतीच प्रतिक दसरा...विजयादशमी..🟤

 * 🚩🍃🌻🚩🚩 🍃🌻🍃🚩🚩🍃🌻🍃🌻🚩🚩🍃🌻 🟤 कृषी व विजयाच्या संस्कृतीच प्रतिक दसरा...विजयादशमी..🟤 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 आश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या घटांची स्थापना केली जाते.नवरात्र अस संबोधल जात.या काळात शक्तीरुपीणी देवीची भक्तीभावाने आराधणा करुन शक्ती संपादन केल जात.नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उत्सवानंतर ज्या सणाची आतुरता असते तो सण म्हणजे दसरा ! नवरात्रीचे नऊ दिवस देवीची मनोभावे सेवा केल्यानंतर या दिवशी देवीला निरोप देण्यात येतो.साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणूनही या दिवसाला एक वेगळे महत्त्व असते. हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला व मोठा सण दसरा हा आश्विन शुद्ध दशमीला येतो. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. त्यांनंतरचा दहावा दिवस म्हणजेच 'दसरा', ह्याच सणाला विजयादशमी असेही म्हणतात. 'दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा' या काव्यातच ह्या सणाची महती गौरवलेली आहे.दसरा हा पराक्रमाचा,पौरुषाचा सण आहे.या सणात चातुर्वर्ण एकत्र आलेले दिसतात.या दिवशी सरस्वतीपूजन व शस्त्रपूजन करण्याची परंपरा आहे.     दसरा या सणाची परंपरा फार पूर्वीपासून...