पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

🌾 पर्यावरणाचे महत्व रुजवणारा तुलसी विवाह सोहळा...

 ▬▬▬▬▬▬▬▬ ❚❂❚❂❚ ▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🌾  पर्यावरणाचे महत्व रुजवणारा तुलसी विवाह सोहळा...🌾       ,✒️____चंदु चक्रवार ▬▬▬▬▬▬▬▬ ❚❂❚❂❚ ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬    हिंदु संस्कृती इतिहासाच्या पानात नव्हेतर,मनामनात पर्यावरणाला पुरक उत्सवाच्या माध्यमाने रुजवण्याचा ऋषीमुनींचा,तत्ववेत्याचा विचार असल्याचे दिसुन येते.असच काहीस तुलसी पुजनाचही आहे.तुळशीची वनस्पतीची पूजा हिंदु संस्कृतीतील श्रद्धेचे प्रतीक आहे.भारतात अनेक राज्यांत नित्यनेमान घराच्या अंगणातल्या तुळशीच्या रोपाला सकाळी पाणी देवुन पूजा,संध्याकाळी  तुळशी वृंदावनासमोर दिवा लावुन नमस्कार केला जातो. दिव्या दिव्या दिपत्कार,दिव्याला पाहुन नमस्कार, दिवा लावला तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवापाशी... अस लहानथोर म्हणतात.मला वाटत,ही दररोज होणारी एकमेव  सकाळ सायंकाळ वृक्षपुजा आहे.प्राचीन काळापासून तुळशीची पूजा केली जाते.तुळशीवृक्षपूजनाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आपल्या तुकोबोंनी तर,वृक्षवल्लींना सोयरे अस म्हटल आहे. वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरें। पक्षीही सुस्वरें आळविती ॥ १ ॥ येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाहीं ...