🚩स्वा. सावरकर एक धगधगते यज्ञकुंड..
🚩स्वा. सावरकर एक धगधगते यज्ञकुंड.. ___________________________ महान पुरुषांचे राष्ट्र तेच महाराष्ट्र,या महाराष्ट्रात आजवर डोंगराएवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची माणसं जन्माला आली. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपली महानता सिध्द केली.दगड धोंड्याच्या,पठारांच्या,पर्वतांच्या,राकट,कणखर प्रांतात रत्ने सापडत नसली तरी,प्रत्येक शतकाशतकांमध्ये पृथ्वीमोलांच्या नररत्नांनी महाराष्ट्रात जन्म घेतला.या नररत्नांच्या मांदीयाळीतल स्वातंत्र्यासाठीच्या रणसंग्रामातल धगधगत यज्ञकुंड म्हणजे, स्वा. सावरकर! सावरकर या महापुरुषाच्या व्यक्तिमत्वात इंद्रधनुष्याप्रमाणे अनेक रंग होते.महान देशभक्त,जहाल क्रांतिकारक, ज्वालाग्राही साहित्यिक,कुसुमकोमल कवी,थोर नाटककार, ओजस्वी इतिहासकार,तत्त्वनिष्ठ राजकारणी,प्रेरक वक्ता,धुरंधर सेनापती आणि खंदे समाजसुधारक.अशा अष्टपैलूनी हे नररत्न प्रकाशत होते अन आहेतही. सावरकर म्हणजे,अधुनिक भारताच्या इतिहासातील 'राष्ट्राय स्वहा:इदन मम!' आपल जीवन राष्ट्रासाठी अर्पण करणार तेजस्वी सुर्यच म्हणावा लागेल.स्वातंत्र्यकाळापासुन ते आजतागत आपल्या तेजप्रकाशाने अनेक...