पोस्ट्स

डिसेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
╔════════ஜ۩۞۩ஜ═══════╗ ⚜️वीर बालदिवस...⚜️ ✍🏼 दहाव्या शीख गुरु गोविंद सिंग यांच्या जन्मदिनाच्या प्रकाश पर्वाच्या शुभ मुहूर्तावर  २६ डिसेंबरला "वीर बाल दिवस" साजरा करण्याच भारताच्या पंतप्रधानांनी केंद्र शासनाच्या वतीन जाहीर केल. २१ डिसेंबर ते२७डिसेंबर हा सप्ताह बलिदान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी शिख संप्रदायातील खालसा पंथाची स्थापना गुरु गोविंदसिंघांनी इ.स.१६९९साली केली.   .दहावे शीख गुरु गोविंदसिंहाच सार कुटुंबच देशधर्म रक्षणासाठी सज्ज झाल होत.त्यांचे पुत्र, ज्यांना चार साहिबजादे हा शब्द एकत्रितपणे संबोधित करण्यासाठी वापरला जातो. गूरुगोविंदसिंहाच्या चार पुत्र; साहिबजादे अजित सिंग,जुझार सिंग, जोरावर सिंग आणि फतेहसिंग हे साहिबजादे रानटी मुघलांपुढे झुकले नाहीत की,धर्मांतरही केले नाही. देशधर्म रक्षणासाठी आपल्या प्राणांच बलिदान दिल.हा आठवडा चार वीर साहिबजादांच्या स्मृतीला समर्पित आहे.तर,२६डिसेंबर हा दिवस  वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जाणार असल्याने याविषयी माझ्या  मनात चार साहिबजाद्यांच्या बलीदानाविषयी माहीती करुन घेण्याची इच्छा जागृत झाली...
 ॅॅंंॅः━═•●◆❃★❂★❃◆●•═━═━   *मानवतेची रुजवणुक करणारे संत* *गाडगेबाबा*           *🏮 ✍🏿चंदू चक्रवार©🏮*     ━═•●◆❃★❂★❃◆●•═━═━    महाराष्ट्राच्या भुमीला संतमहात्म्यांनी सद्गविवेकाच्या पेरणीने पावन बनविले. अवघ्या देशात एकमेव अस राज्य ज्याला राष्ट्र संबोधल जात.अशाच महान महाराष्ट्राला महान बनवणार्‍या संतांच्या मांदीयाळीतल्या संत ज्ञानदेवांनी समरससमाज भावनेच्या समाजमंदीराचा भक्कम पाया उभारला "तुका झालासी कळस"तर याच मंदीरावर गाडगेबाबांनी सेवापताका फडकावली.    अंधश्रद्गा अन कर्मकांडात गुंतलेल्या समाजमनाला    तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |"    असे आपल्या आचरणातुन अन किर्तनातुन नुसतच समजावल अन सोडुन दिल अस नाही तर,निरिश्वरवादी,देवधर्म न मानणार्‍या बाबांनी धर्म नाकारलाच नाही.उलट सेवाधर्म समाजाला शिकवला.    आज अनेक पुरोगामी मंडळी मात्र बाबांच्या सेवाकार्याला आपल्या कल्पनेतल वळण देवुन समाजसुधारणावादी बाबांना देवधर्मच नाकारणारे,ठरविण्याचा खटाटोप करताना दिसतात. देव न मानणारे बाबा,'देव रोकडा सज्जनी'...