छत्रपती संभाजी राजांना विचाररुपी मानाचा मुजरा🚩
═════•🚩❁❀❁🚩•═════✧*🚩✧═════• 🚩छत्रपती संभाजी राजांना विचाररुपी मानाचा मुजरा🚩 ✧═════• ❁❀❁🚩•═════✧*✧═════• 🚩 "तव तेजाचा एक अंश दे तव धैर्याचा जरा स्पर्श दे ॥ तव तेजातिल एक किरण दे । तव जीवनातला एकच क्षण दे .... स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. तिथीनुसार संभाजी महाराजांची पुण्यतिथी किंवा बलिदान दिवस पाळला जातो. किल्ले पररंदरावर १४मे १६५७ रोजी महातेजस्वी,परमप्रतापी शिवबांचा "छावा"जन्मला.लहान असतानाच आईच छत्र काळान हिरावुन नेल.महाराणी सईबाई त्यांना सोडुन गेल्या.राजमाता,राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी त्यांच्यावर मायेच छत्र धरले.लहानपणापासूनच शिवबांप्रमाणेच शास्त्र आणि शस्त्र यांचे ज्ञान देले होते. वयाच्या आठव्या वर्षी मुले खेळण्या बागडण...