पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रुग्णसेवा हीच इशसेवा मानणार्‍या जीवनदात्याला नमन

 ▬▬▬▬▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬▬▬▬▬ *रुग्णसेवा हीच इशसेवा मानणार्‍या  जीवनदात्याला नमन...!!*     ▬▬▬✍🏼              *चंदू चक्रवार भोकर* ▬▬▬▬▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬▬▬▬▬ आपल्या संस्कृतीचा इतिहास इतिहासाच्या पानावर नाहीतर,इथल्या साजर्‍या होणार्‍या उत्सवात आहे.अनेक सणोत्सवांच्या रेलचालीत भर म्हणुन आपण अनेक विशेष दिवसही साजरे करण्याची परंपरा रुजवली.  खरतर,उगवणारा प्रत्येक दिवसचनवचैतन्याची पावती असते.त्यातही काही विशेष महत्त्व प्राप्त झालेले दिवस ऋणविमोचनासाठी साजरे करायचे असतात त्यातलाच आजचा दिवस एक जुलै ! असाच विशेष महत्त्व प्राप्त झालेला  आजचा दिवस !    अवघ्या जगाचा पोशिंदा बळीराज्यासाठीचा कृषीदिन,रुग्णसेवा हीच मानुनी ईश्वरसेवा करणार्‍या डॉक्टरांचा दिन व आर्थिक व्यवहार चोख ठेवायला मदत करणारे सीए  यांचा सी.ए. दिन असा त्रिवेणी संगमाचा दिवस!    संपूर्ण देशात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीन 'डॉक्टर 'डे' म्हणजेच राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा होतो.हा दिवस समाजाची मोठ्या प्रमाणावर सेवा करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मच...