**रंगोत्सव मनामनांचा*
🎋🍁🍃🍁🍂🍃🍂🍁🎋🍃🍂 🍁🍃🍁🍂🍃🍂🍁🎋 🟤*रंगोत्सव मनामनांचा*🟤
🍁🍂🍃🎋🍁🍃🍁🍂🍃🍂🍁🎋🍃🍂 🍁🍃🍁🍂🍃🍂🍁🎋
आज होळीचा सण.हिंदु संस्कृतीत अनेक सणांची रेलचेल चालु असते.या आनंदाच्या उत्सवाची आतुरतेने वाट पाहिली जात असते.असा हा लोकोत्सव..
काम क्रोध लोभाच्या रचूया गोवऱ्या
षडरिपू त्रिदोषाच्या अपेक्षा जाळू साऱ्या ज्ञानाग्निने जाळून करुया राख
बीज द्वेषाचे निराशेचे करु खाक
सुख शांती पूर्ण होवो..
समाधान,आनंदी आरोग्याच्या सर्वांना वारकरी संत अस म्हणतात, होळी हा लोकोत्सव. ऊत्तर भारतात होरी,महाराष्ट्रात होळी,शिमगा, कोकण, गोमंतकात शिग्मा,शिग्मो ह्या नावांनी तो प्रसिद्ध आहे. देशी नाममाले त हेमचंद्रा ने ह्या लोकत्सवाला 'सुगिम्हअ' (सुग्रीष्मक) असे म्हटले आहे... सुगिम्हअवरून शिग्मा हा शब्द आला आणि वर्णविपर्यासाने त्याला शिमगा हे नाव पडले. ते महाराष्ट्रात रूढ आहे.
याशिवाय ह्या उत्सवाला हुताशनी महोत्सव आणि दोलायात्रा,
कामदहन अशीही नावे आहेत.शालिवाहन शकाच्या मासगणनेप्रमाणे शेवटचा महिना जो फाल्गुन.फाल्गुन शुक्ल नवमीपासून हा फाल्गुनी पौर्णिमेपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो,असे ऋग्वेदी ह्यांनी त्यांच्या आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास ह्या ग्रंथात नमूद केले आहे.वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो,अशी ह्या सणाची एक उत्पत्ती.ओडिशात कृष्णमूर्ती पालखीतून मिरवीत नेतात. घराघरातले लोक बाहेर येऊन कृष्णमूर्तीला अत्तर लावतात आणि गुलाल उधळतात.या होळी सणात मी राजस्थानात आहे.इथेव संपुर्ण उत्तर भारतात या सणाच महत्व काही औरच;
अबालवृद्गही होळीचा आनंद लूटताना पाहीली.ब्रम्हदेवाच्या नगरीत पुष्करक्षेत्री होळीचा आनंद घेतोय. खरतर,जयपुरजवळ खाटुश्याम व मथुरेतल्या होळीच वर्णनकरण्यापेक्षा अनूभवण्याचा आनंद घेण आजवर जमल नाही.देशविदेशातले होळीसाठी इथे जमतात. महाराष्ट्रात सामान्यतः फाल्गुनी पौर्णिमेला होळी पेटवली जाते. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य करतात.दुसऱ्या दिवशी होळीवर तापवलेल्या पाण्याने स्नान केले जाते.गोव्यात होळीच्या उत्सवात बीभत्सपणा फारसा नसतो.लोक नाचतात,गातात.होळीसाठी एक १५-२० हात उंचीचा वृक्ष पाडून ठेवलेला असतो.होळीच्या रात्री ढोलकी वाजवीत लोक वृक्षाकडे जातात.त्याची पूजा करून त्याच्या फांद्या तोडतात.मग तो सोट खांद्यावर घेऊन देवळाकडे जातात.तेथे होळीसाठी खड्डा खणून ठेवलेला असतो.त्यात तो सोट उभा करून आंब्याच्या पालवीने सजवितात. त्याच्या डोक्यावर एक असोला नारळ ठेवतात.होळीला हळदकुंकू वाहतात. नारळ फोडतात. ह्या वेळीमात्र बोंबा मारून अश्लील शब्द बोलतात.
ाहोळीच्या या उत्सवामागे ऋतुचक्राप्रमाणेच पौराणीक कथाही
दडली आहे.हिरण्यकशपु नावाचा राक्षसराजा होता.त्याला सर्वत्र हिरण्य म्हणजे सोनेच दिसायचे.अतिवैभव लाललेस ग्रस्त राजा स्व:तला देवही समजु लागला.खा,प्या अन मजा करा अशी मनोवृत्ती असल्याने त्याने आपल्या राज्यात स्वैराचार,अनाचार माजवला होता.अशावेळी"यदा यदा धर्मस्य.."या श्लोकासम अन्यायाच परिमार्जन होवुन अत्याचाराचा अतिरेक नष्ट व्हावा.म्हणून प्रल्हादरुपी भगवंतान जन्म घेतला.तोही त्याच्याच पोटी.तो ईश्वरभक्ती व विष्णुचिंतन करायचा.एवढच नव्हेतर,आपल्या सहवासात आलेल्यांना ईश्वर चिंतनाच महत्व समजावयाचा.हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला त्याला खूप समजावले.तो बदलेना, तेव्हा त्याला मारण्याचे अनेक प्रयत्नही केले.त्यात त्याला यश मिळालेच नाही.प्रत्येकवेळी प्रल्हाद वाचला.
आजही काहींच्या मते होलाका,ढूंढा,पूतना ह्यांसारख्या लहान मुलांना घातक ठरणाऱ्या राक्षसिणींशी सारख्याच नव्यारुपात,नव्या नावाच्या प्रदुषणाच्या नव्या राक्षसिणीं जिवंत आहेत.यांच दहन आपण आज करणार आहोत.होळीच्या पवित्र अग्रिमध्ये,यांचे दहन करुन आपण सर्वाच्या आयुष्यात आनंदाची..सौख्याची धुळवड करायला हवी.
होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो.वसंताच स्वागत रंग उधळुन केल जात.हा उत्सव मनामनाला भावणार्या
आनंदाची,उत्साहाची मुक्त उधळण रंगाच्या माध्यमाने करत हा आनंदोत्सव रंगोत्सव,रंगपंचमी साजरी केली जाते. पुवीॅ पळसाच्या फुलांनी रंग बनवून खेळला जायचा.धुलिवंदनाला ऐकमेकांच्या अंगावर टाकण्यासाठी उपयोगात येणारा रंग बनवण्यासाठी पळसाच्या फुलांचा वापर व्हायचा.पळस ही आयुवेॅदिक औषधी वनस्पती म्हणुनही याचा वापर होत असे. पळसाची फुले टाकुन स्नान केले तर,त्वचारोग नाहीसा होतो.पळस बियांचाही औषधीनिमीॅतीसाठी वापर होत असतो.अशा फुलांचा वापर करुन रंगोत्सव आजही साजरा करुन परंपरा जपुही शकतो हा उत्सव वैद्यकशास्र पुरक तसेच मानसशास्रीय दृष्ट्याही महत्वाचा आहे. रंगोत्सवाचा रंग कसा असावा?तो असावा,तुकाराम महाराजांच्या अभंगासारखा,जिजाऊंच्या प्रेरणेसारखा,शिवरायांच्या विचारांसारखा,संभाजी राजांच्या पराक्रमासारखा,माणसाला माणूस जोडण्याचा.रंग असावा,माणसात देव शोधण्याचा.
आपसातील लहान-मोठा भेद,गरिबी श्रीमंती व वर्षभरात झालेले इतरांशी वाद-विवाद विसरून आनंदोत्सव साजरा करावा.यामुळे आपले नातेसंबध दृढ होतात.तेव्हा,
रंग लागु दे,स्नेह जागु दे,नाती जोडु आनंदाने..
लहानपणी शोले पिक्चरमधील डायलाॅगद्गारे मित्रांना विचारायचो." होली कब है.,"मित्र उत्तर द्यायचा," सरदार,तीन दिन बाद!"दोनतीन दिवस अगोदरच बेत बनायचा.मनातल्या मनात'रंग बरसायचे...
कालौघातात होळीचा आनंदाचे रंग पुसट होवु लागले.आनंदाचे क्षण जगरहाटीत फिक्कट होवु लागले.बालपणाचा काळ सुखाचा..काय नाही केल आम्ही होळीला..गांधी चौकात जुनी वस्ती लाकडही भरपुर घरोघरी असायची. नजर चुकवुन आम्ही गुपचुप लाकडी नाटा,मोठ्या फळ्या,बांबु जमेल तस जमवायचो.जमवलेल्या मालावर कुणी दुसरा डल्ला मारु नये म्हणुन मध्यरात्रीपर्यंत त्या लाकडी खजिन्याभोवती पहारा द्यायचो. आपली होळी मोठ्यात मोठी व जास्त वेळ कशी जळत राहील.ऐवढच माहीत असायच.होळी रचवली जायची,मानकरी पेटवायचे,पुजेला आलेल्यांवर शिव्यांची होळी..हाळी..बोंब गाजायची.होळीत चणे,खोबर भाजुन देण्यासाठी टॅक्स द्यावा लागायचा.किती म्हणुन आठवणी सांगु;मनाच कपाटच भरलय आठवणींच्या साठवणीन.हा होळीचा दिवस असा जायचा,
दुसर्या दिवशी रंगपचमीच्या सांगु तरी कशा आणि किती आठवणी?ताशाच्या गोंधळात मारलेल्या बोंबा..होळीला विशेष प्रिय असलेल
'गर्दभ'वाहनावरची स्वारी,दिवसभर बैलगाडीवर रंगाची टाकी बांधुन रस्त्यावरच्या माणसाला पुर्ण रंगवत भिजवण्यात मनस्वी आनंद वाटायचा. लपलेल्या मित्राला घरातुन बाहेर काढतानाचा आनंद अवर्णणीयच.धुलीवंदन हा उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा करायचो. आताही तो रंगाचा वर्षाव आठवणीत मनान चिंब भिजत.. ह्या आठवणी घरात बसुन आठवायच्या..
खरतर,बालपणी राग,रूसव्याच महत्व फार.ज्यांच्याशी वर्षभर अबोला असायचा त्याच्या घरासमोर शिव्यांची लाखोली मुक्तकंठाने वाहायचो. आमच्या गल्लीशेजारची गल्ली होती देशमुखांची, देशपांड्याची.मनसोक्त मुक्ताफळे देशमुख देशपांड्यांना मिळायची. आज होळी पांड्याची..अरे हा देसाई काय म्हणतो..हा सावकार काय म्हणतो..कशाकशा शिव्या असायच्या..आनंदान मनसोक्त नाचन बागडण,मनमोकळ हसण हे सार घडायच.रागलोभ,द्गेष,मत्सरांना कोसोदुर ठेवत होळी गाजायची.अंधारख पडु लागला म्हणजे, जगावेगळ्या घोषणा देण्यासाठी काल पेटवलेल्या होळीजवळ जमुन द्यायचो.होळी होळी पुरणाची पोळी..पुढल्या वषीॅ लवकर या..म्हणत घरी जायच.तीनचार दिवस तोंडही ओळखु यायची नाहीत.घरी आई वडील,आजींच्या बेदम मार२ सोसतच शाळेत जायच तर,गुरुजीही चोप द्यायचे.आमच्या काळातले गुरुजी फारच महान.बोलल तरी मारायचे न बोलल तरी मारायचे.या प्रसंगी माझे कन्या अन नुतन शाळेतले गुरुजी,बाईही आठवल्या.या आठवणींच्या साठ्यातुन आठवणींचे मोती काढायला.आजवर वेळच मिळाला नाही.वयानुरुप संसाराच्या रामरगाड्यात होळीच्या आठवणी काढत रहायच्या.अन साजरी करायची.आता वयानुरुप आलैल्या प्रगल्भतेमुळ होळीच्या सणात होणार पर्यावरणाच नुकसान दिसतय.तेव्हा वैचारीक,पर्यावरणपुरक होळी अन रंगोत्सव साजरा करायच अन बालपणीच्या रंगात रंगायच ठरवल. चला,उत्साहाने ही धुळवड उडवु चला...
अस म्हणतानाही या रंगोत्सवात रंगाचा भंग करणारे प्रसंगही घडतात. ते टाळुन आपण पर्यावरण पूरक होळी व रंगोत्सव साजरा करणे आज काळाची गरज बनली आहे.आज काही ठिकाणी हानिकारक अशा केमिकल सर्रास वापर होताना दिसतोय.ज्यामुळे आपल्या व आपल्या बांधवांच्या आरोग्यावर अनिष्ट असे परिणाम होत आहेत.याचाही आपण थोडा विचारही करण गरजेच बनल आहे.या आनंदात विरजण टाकणारी अनेक मंडळी सण संस्कृतीला व आरोग्यालाही धोका निर्माण करत आहेत.रंगाचा बेरंग करणार्या रेडआॅक्साईड नावाचं केमिकल,कॉपर सल्फेट,मक्युरी, ॲल्युमिनियम क्लोराइड,क्रिश्चियन ब्लु,आयोडाईट,अशा अनेक केमिकलमुळे डोळ्यांवर, मांसपेशीवर,त्वचेवर,तसेच श्वासयंत्रणेवर अनिष्ट असे परीणाम घडत आहेत.केमिकलचा वापर टाळावा. या संदर्भाने थोडासा विचार करुन जनजागृती करण्याची गरजही भासत आहे.
चार वर्षापुवीॅ"ग्रामविकास समितीच्या माध्यमाने किनवटचे राजु जोशी,नरेंद्र जोशी व आम्ही सर्वजण भोकर तालुक्यातल्या शिंगारवाडी येथे'पळसफुलांपासुन नैसगिॅक रंग बनवुन भोकर शहरात विक्री केली.त्यात शिंगारवाडीच्या तरुणांच्या हाताला काम मिळाले. यावषीॅ रंगनिमिॅती मोजकी केली."सत्ता से मत करना परिवर्तन की आस.."केवळ सत्तेच्या माध्यमाने परीवर्तन घडत नसत तर,मनामनात परिवर्तनासाठी सर्वच क्षेत्रात पेरणी व्हायला हवी.एक कवी आजच्या वस्तुस्थितीबद्दल लिहतो,
नैराश्येची मोळी बांधुन ती ,होळीत टाकुन होळी पेटवु या,
आली रे आली,होळी आली. चला,आज पेटवू या होळी
नैराश्याची बांधून मोळी...
दाखवून नैवद्य पुरणपोळीचा,मारूया हाळी...
होळी रे होळी,पुरणाची पोळी
आपणच आपल्या प्राचीन व समृद्ध अशा परंपरेला जपून पर्यावरणपूरक होळी व रंगोत्सव साजरा करू या,
मत्सर,द्वेष,मतभेद जावु विसरूनी,रंग आनंदाचे अन नावीन्याचे,
उधळु या,..
उत्सव जल्लोषाचा अन चैतन्याचा,घेवुनी येवो,सर्वांच्या जीवनात हा क्षण यशाचा,समद्वी अन सुवर्णाचा...
असा सुवर्णक्षण आपणही रंगोत्सवात अनुभवावा.
आपल्या चेहर्य्यास रंग लागु दे,मनात आपल्या स्नेह जागु दे,
भंगलेली नाती सांधु दे, मैत्री अन नात्यांची तळी भरुन जाउ दे,
त्यात मन अन शरीर भिजुन चिंबख चिंब भिजुनी जाउ दे,
प्रेमाचे मळे मनामनात फुलु दे...
होलिकोत्सवाच्या अन रंगोत्सवाच्या लक्षलक्ष शुभेच्छा देतच संकटरुपी होलीकेच दहन करुनी पुढच्यावषीॅ प्रतिवषीॅप्रमाणे रंगोत्सव व आनंदोत्सव साजरा करण्याचा संकल्प करु या...
चला,उत्साहाने ही धुळवड उडवु चला... होळीनिमित्य सुचिंतन...
© 🖋️
चंदु चक्रवार .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आजवर वाचककृपेमुळे मी बोलता, लिहता झालो,हे मान्य करतो. यापुढेही आपल्या अवधानाची अपेक्षा करतो.वाचकांना विनंती आजवर
माझ्या बालसुलभ शब्दांना आपण वाचन करून मला उत्तेजित केलत. तुमच्या कृपादृष्टीचा वर्षाव आजवर माझ्यावर झाला. त्यामुळच तर मला लिहण्याच सामर्थ्य लेखनबळ मिळत गेल,ज्ञानाचा अंकुर फुटत गेला.तो सुकून जावु नये.
यासाठी मला माझ्या चुका दाखवत गेलात तरच,माझ्यात सुधारणा होतील
आपल्या सद्भावनांचा फुलोरा ब्लाॅगवरील कमेंट बाॅक्समध्ये उमटु द्या.अधिकाधिक वाचकांना ब्लाॅग वाचनासाठी प्रेरीत करा..