देशाचे भाग्य बदलण्यासाठी मतदान कराच..
भारताच्या स्वातंत्र्यासाठी लक्षावधी राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या बलिदानातुन भारत स्वतंत्र झाला.स्वातंत्र्यवीरांनी आपल आयुष्य वेचल.स्वराज्य,स्वदेशी,स्वावलंबन बहीष्कार या चतु:सुत्रीने स्वातंत्र्य चळवळ टिळकांनी तळागाळापर्यत पोहचवली. सुभाषबाबुंनी आझाद हिंद सेना स्थापुन इंग्रजांना सळो की पळो केले.स्वातंत्र्यवीरांनी जन्मठेप भोगली.लक्षावधींनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले.
स्वराज्य आले,सुराज्य येण्यासाठी आपण आजही धडपडतो आहोत. पुर्णत: गरीबी आजही हटली नाही.सुजलाम सुफलाम देश अजूनही घडावयाचा आहे.चार ऋतु,सर्व प्रकारचे हवामान, मुबलक पाणी असे असताना आपण जगातील प्रगत राष्ट्र असायला हवे.सत्तेचाळीसला आपण स्वातंत्र्य झालो.त्यादरम्यानच जपान बेचिराख झाला होता. आपली व जपानची तुलना केली तर ते आज कुठे?आपण कुठे?या कारणांचा शोध घेतला तर आपली दरीद्री मानसिकता व मतदान करण्याविषयीची मानसिकता हे उत्तर येत. इमारत भक्कम करायची असेल तर तिचा पायाही भक्कम असायला हवा.सुदृढ लोकशाहीच्या उभारणीचा पाया हा फक्त आणि फक्त मताधिकार असतो.मतदानाचा अधिकार हा सर्व नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे आणि ते प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्यही आहे. मतदानाचा हक्क मिळाल्याने बहुधा देशाच्या प्रगतीत आपला वाटा आहे.याची जाणीव होते.मतदानाचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीने मतदान केलेच पाहिजे असे माझे मत आहे कारण तो आपला हक्क आहे.
"आपल्या मताचे दान, आहे लोकशाहीची शान ।
लोकशाहीने देशातील सर्व लोकांना मतदानाचा हक्क अन अधिकार दिला असताना अनेकजण मतदानाचा हक्क बजावण्याच कार्य करत नाही.त्यांना वाटत मी एकट्याने नाही केल तर काय फरक पडणार आहे? मतदानानिमित्त सुट्टी आहे या सुट्टीचा आनंद उपभोगु या, कुठेतरी सहल काढु या,खुप उन पडल आहे.म्हणुन मतदानाला न जाणे.कोणीही निवडून आला तरी आम्हाला काय देणार आहे? सगळे सारखेच आहेत.कोणाला मत देवून काय उपयोग? हे असले विचार म्हणजे,निरुपयोगी, नाकर्तेपणाचा कळसच.यावर वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा मतदारांना इशारा देताना म्हटलय,
भवितव्य गाव अथवा राष्ट्राचे। आपुल्या मतावरीच साचे। एकेक मत लाख मोलाचे। ओळखावे याचे महिमान।। मत हे दुधारी तलवार । उपयोग न केला बरोबर । तरि आपलाचि उलटतो वार। आपणावर शेवटी ।। दुर्जन होतील शिरजोर । आपुल्या मताचा मिळता आधार । सर्व गावास करितील जर्जर। न देता सत्पात्री मतदान ।। मतदान नव्हे करमणूक । नव्हे बाजार-चुणूक।
निवडणूक ही संधि अचूक । भवीतव्याची ।।
निवडणूक जणू स्वयंवर । ज्या हाती देणे जीवनाचे बागडोर । त्यासिघ लावावी कसोटी सुंदर । सावधपणे ।।
आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटत आपला देश सुजलाम सुफलाम व्हावा, शांतीसह समृद्गी नांदावी.सर्वकाही मनासारख घडाव.हे घडवायच असेल तर सर्वांनीच मतदान करायला हव. तेव्हाच"लोकांचे सरकार, लोकांद्वारे आणि लोकांसाठी" ही अभिव्यक्ती साकारेल.जेव्हा प्रत्येक नागरिक निवडणूक प्रक्रियेत भाग घेईल.तेव्हाच खऱ्या अर्थान लोकांनी लोकांसाठी चालवलेल राज्य येईल. यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान मी तर करेनच व आपल्या इष्टमित्रांनाही करावयास लावेन असा निर्णय केला तर,याचा परिणाम राष्ट्राच्या आणि स्वतःच्या कल्याणावर होत असतो. आपल्या एका मतावरच आपल्या राष्ट्राचे भवितव्य अवलंबुन असते.
भारतीय संस्कृतीत दानाची विशाल परंपरा आहे.आपण अन्नदान, नेत्रदान!रक्तदान करत असतो. देण्याला दान अस म्हटलय.हे दान द्यायचय ते उज्वल भारतासाठी पण आपणापैकी अनेकजण हेच तर करत नाहीत.ज्यांनी केलय त्यांच दानही सत्पात्री केलय का?मतदानाच्या रांगेत उभ राहुन जातपंथ धर्म वर्ण भाषा ह्या मानसिक कुपंणाला छेदत मतदान केल तर आपल्या विकासाला पोषक व्यक्तीला सर्वोच्च पदावर बसविण्याचे सामर्थ्य तुमच्या एका मतात असत.त्याचे सकारात्मक परीणाम दिसुन येतात.
केवळ लोकसभेचीच नव्हेतर,प्रत्येक निवडणूक राष्ट्राच्याच नव्हेतर,आपल्याही हिताच्या भवितव्यासाठीची असते.देश म्हणजे, दगडधोंडे,नद्या समुद्र पर्वतमय भुभाग नव्हेतर,देश म्हणजे देशातील माणसे देश माणसांनी बनतो.आपण मतदान केलच पाहीजे.थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे एका-एका मतानेच मतांचा डोंगर उभा राहतो. यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच शेजाऱ्या पाजाऱ्यांचे मतदान होईल.मित्र, नातेवाईक,शैजारी यांचेही कसे मतदान होईल.याकडेही लक्ष यावयाच आहे.कारण निवडणुकीत एकेक मत निर्णायक आणि मोलाचे त्यातुनच आपला मतदानाचा हक्क बळकट होण्यासह,देशाची लोकशाही सदृढ व सक्षम होत असते.देश व समाजहितासाठी
आपलाही खारीचा वाटा आपण देवु शकतो.यासाठी आपण सतर्क राहून १०० टक्के मतदान होईल म्हणून प्रयत्न करु या अन आपल्या देशाला परमवैभव मिळवुन देवु या..
देश के लिये जीये,समाज के लिये,
ये धडकणे यू श्वास ये,पुण्यभुमी के लिए..
चंदू चक्रवार
मुख्याध्यापक सोनारी _____________________________________________
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आजवर वाचककृपेमुळे मी बोलता, लिहता झालो,हे मान्य करतो. यापुढेही आपल्या अवधानाची अपेक्षा करतो.वाचकांना विनंती आजवर
माझ्या बालसुलभ शब्दांना आपण वाचन करून मला उत्तेजित केलत. तुमच्या कृपादृष्टीचा वर्षाव आजवर माझ्यावर झाला. त्यामुळच तर मला लिहण्याच सामर्थ्य लेखनबळ मिळत गेल,ज्ञानाचा अंकुर फुटत गेला.तो सुकून जावु नये.
यासाठी मला माझ्या चुका दाखवत गेलात तरच,माझ्यात सुधारणा होतील
आपल्या सद्भावनांचा फुलोरा ब्लाॅगवरील कमेंट बाॅक्समध्ये उमटु द्या.अधिकाधिक वाचकांना ब्लाॅग वाचनासाठी प्रेरीत करा..