।।आजी सोनियाचा दिनु ।।वासवी जन्मोत्सव.
✍🏻
।।आजी सोनियाचा दिनु ।।
आजी सोनियाचा दिनु ।
वर्षे अमृताचा घनु ॥१॥
दृढ विटे मन मुळीं ।
विराजीत वनमाळी ॥३॥
बरवा संत समागमु प्रगटला आत्मरामु ॥४॥
कृपासिंधु करुणा कर ।
आज वासवी जन्मोत्सव..
माता कन्यकेच्या कृपाशिर्वादाने संपन्न 'होण्याचा दिवस..आजचा दिवस सोन्याचा,अमृतमयी दिवस!जणु अमृताचा पाऊसच बरसला असे मला वाटते.कारण आज, आपणा सर्वांनाच माता कन्यकेच्या कृपाशिर्वादाचा साक्षात्कार अंतरबाह्य सर्वव्यापी असेल.
या देवी सर्वभूतेषु विद्या रूपेण संस्थिता ..
नमस्तस्यै नमो नम:
मातेच्या सत्संगात आपणा सर्वातला आत्माराम हृदयामध्ये प्रगटणार दयेचा सागर असलेली माता भक्तावर कृपा करणारच आहे.अशा दयासागर मातेविषयी आज आपण थोड जाणुन घेवु या.
पेनुगोंडा येथे राजा कुसुमश्रेष्ठी यांच राज्य होते.त्यांची राणी कुसुमांबेला लग्नाला बरीच वर्ष झाली तरीही पुत्रसुख मिळाले नव्हते. राजा कूसुमश्रेष्ठी व कुसुमांबा दोघेही चिंतित असायचे. असेच ऐकदा त्यांनी आपले गुरू भास्कराचार्यांशी मसलत केली. आपल्या वंशवेलीवर फुल उमलावे यासाठी उपाययोजना सांगा अशी विनवणी केली. त्यावर भास्कराचार्यंनी राजा कुसुमश्रेष्ठीला पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यासाठीचा सल्ला दिला.
गुरुच्या आदेमानुसार राजा व राणीने यज्ञश्रकरण्याच ठरवल.यज्ञाचे पौरोहित्य आपले गुरू भास्कराचार्यांना स्वीकारण्याची विनंती केली आणि भास्कराचार्यांनी ती विनंती मान्य करुन यज्ञपौरहित्य स्विकारल. त्याप्रमाणे यज्ञकार्य संपन्न झाल.
या यज्ञामुळे देवदेवता प्रसन्न झाल्या.व त्यांनी आकाशवाणी केली. यज्ञेश्वरामार्फत प्रसाद पाठविला. हा प्रसाद ग्रहण केल्यानंतर राणी कुसुमश्रेष्ठीला अपत्य प्राप्त होईल. असा देवतांनी आशीर्वाद दिला. कुसुमांबा यांनी वैशाख शु.शुक्रवारी उत्तरा नक्षत्रावर कन्या राशीत ऐक मूलगा व एक मुलगी अशा दोन जुळ्यां बाळांना जन्म दिला.मुलांचे नाव विरूपाक्ष व मुलीचे नाव वासवी ठेवण्यात आले.चंद्राच्या कलेप्रमाणे 'वासवी'व विरुपाक्ष मोठी होत गेली.
भास्कराचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली, विरुपाक्ष पुराण,तलवारबाजी, घोडेस्वारी,युद्धकला,धनुर्विद्या, राज्यशास्त्रात जे राज्य करण्यासाठी आवश्यक होते अशा शिक्षणात प्रविण बनले तर वासवीने ललित आणि तत्त्वज्ञानात प्रभुत्व मिळवले भास्कराचार्यांनाही वासवी बद्गिवंत शिष्या असल्याचा अभिमान होता.
विरुपाक्ष योग्य वयात आल्याने आयलुर शहरातील अरिधी सेट्टीची मुलगी रत्नावतीशी विवाहबद्ग झाले. वासवीचे लग्नही एक दिवस त्याच था थाटामाटात पार पडेल,असे वाटले."दैव जाणिले कुणी?"काळाच्या भाळावर अन वासवीच्या दैवात वेगळेच काही लिहुन ठेवले होते.
क्षत्रिय राजा विष्णू वर्धन साम्राज्याचा विस्तारासाठी मोहिमेवर निघाले असताना पेनुगोंडा जवळुन जात असल्याचे कळताच राजा कुसुमश्रेष्ठींनी त्यांना आपल्या नगरीत आमंत्रीत करुन त्यांच भव्य मिरवणुक काढून त्यांच स्वागत केले आणि मोठ्या सभागृहात एक सत्कार कार्यक्रम आयोजित केला.या सन्मानसोहळ्यात
विष्णूवर्धनच्या दृष्टीस वासवी पडली अन ते प्रेमात पडले. तिच्याशिवाय जगू शकत नाही असे वाटल्याने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय केला आणि मंत्र्यामार्फत चौकशी करुन त्यांनी तशी इच्छा कुसुमाश्रेष्टीला केली.ही घटनाच कुसुमाश्रेष्टीला धक्का देणारी ठरली.सम्राट विष्णुवर्धन आधीच विवाहित होते शिवाय वयाने खूप मोठे अन तत्कालीन जातीवर्ण व्यवस्थेप्रमाणे हा विवाह प्रस्ताव स्वीकारण्याच्या किंवा नाकारण्याच्या द्गिधा मन: स्थितीत ते होते.पुढे हौणार्या परीणाची चिंतेने पोखरल होत.अत्यंत तणावजन्य स्थिती कुसुमश्रेष्ठिपुढ निर्माण झाली.
यामुळे कुसुमा सेट्टी यांच्यासाठी त्यांनी या स्थितीबाबत त्यांच्या कुटुंबीयांशी आणि जवळच्या मित्रांशी चर्चा केली.आणिकूसुमश्रेष्ठींनी
वासवीलाच तिच्या विवाहाचा स्वयं निर्णय घेण्याचा अधिकार दिला. वासवीला या संबधाने आपली बाजु मांडण्याची संधी दिली.सांसारिक गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता आयुष्य परमेश्वराच चिंतन करत आयुष्यभर अविवाहित राहण्याची इच्छा वासवीने व्यक्त केली.
कुसुमश्रेष्ठीं राजा विष्णुवर्धनला नकार संदेश पाठवला.
विष्णुवर्धनला राजा या नकाराने क्रोधित झाला आणि त्याने निर्दयीपणे वासवीला आणण्याचा आदेश सैन्याला देऊन सैनिकाची तुकडी पेनुगुंडावर पाठवली.पेनुगोंडाच्या शूरांनी साम,दाम,दंड भेद या शस्राचा वापर करुन विष्णुवर्धनाच्या सैन्याचा पराभव केला.अस झाल तरी बलाढ्य सैन्यापुढ हा विजय तात्पुरता होता.याव ठोस उपाययोजना व्हावी म्हणून कुसुमश्रेष्ठींनी कुलगुरू भास्कराचार्य यांच्या उपस्थितीत सर्व अठरा शहरांचे प्रमुख आणि सर्व ७१४ गोत्रांच्या प्रमुखांची महापरिषद बोलावली.या परिषदेतही मतभेद झाले.१०२ गोत्रांच्या प्रमुखांनी "जे जन्माला येतात आणि डरपोक मरतात ते त्यांच्या मृत्यूपूर्वी अनेक वेळा मरतात परंतु शूरांनी मरणाची चव एकदाच चाखली पाहिजे. विरोधक जरी बलाढ्य असला तरी ठिणगीचा ढीग जाळू शकत नाही का? म्हणून, आपण एका चांगल्या कारणासाठी लढूया,असा ठाम निर्णय घेतला तर ऊर्वरित६१२ गोत्रांच्या नेत्यांना ही वैवाहिक युती अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरेल.
यावर कुलगुरु भास्करचार्य म्हणाले: "आपण आपल्या प्राणांची किंमत मोजूनही आपला सन्मान राखला पाहिजे"हे शब्द कुसुनश्रेष्ठींसाठी प्रेरणा देणारे ठरले,युद्गाने अल्पसंख्याक बनले असले तरीही त्यानी आपली मुलगी वासवीचा विवाह राजाशी न करण्याचा निर्धार घेतला.
या घटनेने एकतेला तडा गेला. जखमी वाघाप्रमाणे सम्राटाने आपल्या विरोधकांचा नाश करण्याच्या दृढ निश्चयाने आपल्या प्रचंड सैन्यासह पेनीगुंडावर आक्रमण करण्याचा निर्णय केला व सैन्याच नेतृत्व स्व:त केले. पेनुगोंडामध्ये समर्थक १०२ गोत्रांच्या समर्थकांसह परिणामांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली.
कन्यका वासवी या घटनास्थळी दाखल झाल्या आणि म्हणाल्या "एका मुलीसाठी आपल्यात रक्तपात का व्हावा? आपल्या स्वार्थी इच्छेसाठी सैनिकांचे प्राण का बलिदान द्यावे. युद्धाचा विचार सोडून देणे चांगले. त्याऐवजी आपण बंड करू या. अहिंसा आणि आत्म-त्यागाच्या माध्यमातून आपण युद्धावर नियंत्रण ठेवू शकतो वासवी यांच्या निर्देशानुसार. गोदावरीच्या तीरावर असलेल्या ब्रह्मकुंडाच्या पवित्र स्थळी शाही सेवकांनी १०६ अग्निकुंडांची विशेष व्यवस्था केली. संपूर्ण शहर हा दिवस सणाचा दिवस म्हणून पाळत होते. कन्यका वासवीने १०२ गोत्रांच्या जोडप्यांना विचारले: "तुम्ही माझ्यासह या पवित्र अग्नीत बुडवाल का?" प्रत्येकाने मनापासून संमती दिली. वासवी हा देवाचा अवतार असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला.व त्यांनी कन्यका वासवीला आपले खरेखुरे स्वरूप दाखविण्याची विनंती केली.
वासवी मातेने स्मितहास्य केले आणि स्वत्व प्रकट केले, सूर्याच्या तेजाहूनही अधिक तेजस्वी असे ते तेज होते. त्या म्हणाल्या,"मी आदिपराशक्तीचा अवतार आहे." स्त्रीच्या प्रतिष्ठेचे आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी, विष्णुवर्धनाचा नाश करण्यासाठी आणि वैश्यांचे मोठेपण जगाला दर्शविण्यासाठी मी कलियुगात आले. अपमानित झालेल्या सतीदेवींनी जसे पवित्र अग्नित प्रवेश केला, तसेच मीही या पवित्र अग्नीकुंडात प्रवेशणार कुसुमश्रेष्ठी गतजन्मी समाधी नावाचे एक महान संत होते.त्यांच्या आकांक्षेनुसार त्यांना १०२ गोत्रातील लोकांसह मोक्ष प्राप्त होऊ शकतो. म्हणूनच मी तुम्हा सर्वांना आत्म बलिदान घेण्यास सांगितले आहे.” वासवी यांनी उपस्थितांना देशभक्ती, प्रामाणिकपणा,समाजसेवा आणि सहिष्णुतेचा उपदेश केला.
या दैवी उपदेशामृतासह वासवी माति अदृश्य झाली आणि लोकांनी तिला मानवी रूपात पाहिले. त्यानंतर सर्वांनी आपापल्या देवांचे ध्यान करून पवित्र अग्नीत प्रवेश केला.विष्णुवर्धनाच्या गुप्तहेरांनी शहरात काय घडले ते सांगितले.त्याला वाईट वाटले.व मोठा धक्का बसला.तो धक्का सहन करू शकला नाही.त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या.हृदयाचे तुकडे झाले.
वासवीचा देह त्याग आणि विष्णुवर्धनाचा अंत ही शहरभर चर्चा झाली. लोकांनी विष्णुवर्धनाच्या निषेध केला आणि युगनिर्माता वासवीच्या अहिंसक तत्त्वाचे कौतुक केले.विष्णुवर्धनाचा मुलगा राजा नरेंद्र याने पेनुगोंडा येथे धाव घेतली आणि घटनेबद्दल पश्चात्ताप केला.
राजा विरुपाक्षने त्याचे सांत्वन केले. "भाऊ, आपण भूतकाळाच्या भक्कम पायावर वर्तमान आणि भविष्य जाणून घेऊ आणि तयार होउ.वासवीने मोठ्या रक्तपाताला थारा न देता लोककल्याणासाठी आपला देह अर्पण केला. तिच्या अहिंसक मार्गाचा स्विकार करुन यापुढे वैश्य राज्य करणार नाहीत आणि ते व्यापार, शेती इत्यादी सेवांसह इतरांच्या सेवेत आणि शुभचिंतकांमध्ये गुंततील.
विरुपाक्षने वैश्य कुलगुरू भास्करार्यांच्या मार्गदर्शनाखाली काशी, गया आणि इतर अनेक तीर्थक्षेत्रांना भेट दिली.यात्रेच्या स्मरणार्थ त्यांनी पेनुगोंडा येथील प्रत्येक गोत्रासाठी १०१ शिवलिंगे स्थापित केली.
राजा नरेंद्रने आदराचे प्रतीक म्हणून वासवीची मुतीॅ स्थापित केली.
त्या दिवसापासून सर्व वैश्यांनी तिची पूजा करण्यास सुरुवात केली आणि तिला वैश्यकुल देवता-वासवी कन्यका परमेश्वरी मानले जाते.
वासवीं मातेच्या जीवनापासुन अहिंसा, धार्मिक मूल्यांवर श्रद्धा आणि स्त्रियांच्या रक्षण हे गुण अंगीकारायला हवेत. ऐहिक सुख नाकारणाऱ्या वासवीने वैश्यांची मने जिंकली. शांतता आणि अहिंसेची आयडाॅल म्हणुन सर्वांच्या मनामनात वासवी वसली आहे.
आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात थानकुसा तालुक्यामध्ये ‘पेनुगोंडा’ या गावी' माता वासवी मातेच भव्य मंदीर आहै.
--------------चंदू चक्रवार ©
———————————————————————
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आजवर वाचककृपेमुळे मी बोलता, लिहता झालो,हे मान्य करतो. यापुढेही आपल्या अवधानाची अपेक्षा करतो.वाचकांना विनंती आजवर
माझ्या बालसुलभ शब्दांना आपण वाचन करून मला उत्तेजित केलत. तुमच्या कृपादृष्टीचा वर्षाव आजवर माझ्यावर झाला. त्यामुळच तर मला लिहण्याच सामर्थ्य लेखनबळ मिळत गेल,ज्ञानाचा अंकुर फुटत गेला.तो सुकून जावु नये.
यासाठी मला माझ्या चुका दाखवत गेलात तरच,माझ्यात सुधारणा होतील
आपल्या सद्भावनांचा फुलोरा ब्लाॅगवरील कमेंट बाॅक्समध्ये उमटु द्या.अधिकाधिक वाचकांना ब्लाॅग वाचनासाठी प्रेरीत करा..