जिगरबाज मराठा योद्घा.सुभेदार मल्हारराव होळकर

 ═════•*═════•❁❀❁•═════**═════•*


🪩*सुभेदार मल्हारराव होळकर*🪩


*═════•*═════•❁❀❁•═════**═════•** तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, 

पण अटकेपार झेंडे रोवण्याची धमक फक्त आणि फक्त मल्हाररावांच्या रक्तातच होती." 

   मल्हाररावांच्या गौरवार्थ एका कवीने आपली लेखणी झिजवली.

कवितेतला एक अन एक शब्द मल्हाररावांच कर्तृत्व उलगडवतो.

   आजकाल समता,सोशल इंजीनिअरींग,ओबीसी फॅक्टरच्या पोकळ वाफा सोडल्या जातात.स्वत:च स्वत:ला पुरोगिमित्वाचे स्वामित्व स्वत:च बहाल करत शब्दखेळ चालवतात.पेशवाई केवळ आणि केवळ अन्यायच झाला.ब्राम्हणवादाच्या नावाच भांडवल करत,अनेक चांगल्या घटनाही आपल्या स्वार्थाच्या भाकर्‍या भाजण्यासाठी दडपुन टाकताना दिसतात.या बुद्गिवंताच्या सुपिक मेंदुत समाजमनाच मनसंधारण करुन समाज जोडण्याऐवजी हे फुटिच्या बीजाचीच पेरणी करत,हेच विचारबीज रुजवतात की काय?अस वाटु लागत. त्यांना वाटत'पेराल तेच उगवत'तेचतेच पेरत जातात की काय?अशी धारणा बनत चालली आहे. खरा इतिहास कधी ना कधी तरी डोक वर काढतो.खर्‍याच खरपण कधी ना कधी उघड पडतच.पेशव्यांनी अनन्वित अत्याचार केले हे सांगताना त्यांनी सोशल इंजीनिअरींग समाजजीवनात रुगवली हे सांगायच सोयीस्कररीत्या टाळतात.असच ऐक उदाहरण म्हणजे,मल्हारराव होळकरांच;ते पहील्या बाजीरावांच्या सोशल इंजीनिअरींगच मुतिॅंमत प्रतिक.

    बाजीरावांनी वर्षानुवर्षे विकासापासुन कोसोदुर गावकुसाबाहेर मेंडपाळ  काम करणार्‍या धनगर जातीतला.अशा मल्हाररावांना संस्थानिक बनवण्यासाठीची संधी देवुन त्यांच्यातल्या कर्तृत्वाला मोकळ आभाळ दिल.बाजीरावांना मोठेपण देत मल्हाररावांच कर्तृत्व कमी लेखण्याचा विषय नाही.याच वर्णन मल्हारराव हीरा तर, बाजीराव रत्नपारखी असच म्हणाव लागेल.

 मल्हारराव जातिवंत शूरयौद्घा,ज्यांनी शून्यातून आपल्या तलवारीच्या पातीवर माळवा प्रांतात स्वतःचे साम्राज्य उभे केले,दौलतीचे थोरले सुभेदार,अटकेपार झेंडे लावून दिल्लीच्या तख्तावर स्वामित्व गाजवणारा महान मुत्सद्‌दी आणि लढवय्या सेनानी म्हणजे सुभेदार मल्हारराव होळकर !

  मल्हाररावांचा जन्म १६ मार्च १६९३ रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळील होळ गावात एका अत्यंत सामान्य  (गडरिया) मेंढपाळ कुटुंबात खंडूजी होळकर यांच्या पोटी झाला.

वयाच्या तिसर्‍या वर्षातच १६९६ मध्ये त्यांच्यावरच पित्याच छत्र काळाने हिरावुन नेल.त्यानंतर  नंदुरबार जवळच्या तळोदा येथे त्यांच्या मामाकडे सरदार भोजराजराव बारगळ यांच्या वाड्यात रहायला गेले.त्यांचे मामा मराठा सरदार कदम बांडे यांच्या घोडदळाचे प्रमख.त्यांनी मल्हार रावांना आपल्या घोडदळात सामील होण्यास सांगितले.बुद्गी व युद्गकौशल्याच्या बळावर लवकरच  घोडदळाच्या तुकडीचा प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात झाले.

   १७१७ मध्ये मल्हारराव त्यांच्या मामाची मुलगी गौतमबाई बारगळ हिच्याशी विवाहबद्ग झाले.लग्नानंतर दोनच वर्षानी १७१९ सालात बाळाजी विश्वनाथ यांनी आखलेल्या दिल्लीच्या मोहीमेसाठी गेले.सन १७२० सालात बाळापुरच्या निजामाविरुद्गच्या लढाईत पराक्रमाची शर्थ केली.काहीकाळ बरवणीच्या राजाबरोबर सेवा केली.१७२१

सालात बांदे यांचेशी भ्रमनिरास झाल्याने,तरुण बाजीराव पेशवे यांच्याबरोबर त्यांची खास मैत्री जुळून आली आणि व त्यांच्यासोबत काम करु लागले.१७२३ते १७२४ च्या पेशव्यांच्या मोहिमेत त्यांनी सहभाग घेतला.राजनैतिक भूमिकेने भोपाळ राज्याशी संबधित वाद मिटवण्यासाठी यशस्वी शिष्टाई केली.१७२५ मध्ये अवघ्या ५००

सैनिंकासह फौजेचे नेतृत्व केले. १७२७ मध्ये त्यांना माळव्याच्या विविध भागात मराठा सैन्य राखता यावे म्हणून पेशव्याकडुन अनुदानरुपी रक्कम मिळाली.१७२८च्या पालखेडच्या लढाईत यशस्वी कार्य करुण आपल नावलौकीक वाढवल. या दरम्यान मल्हारबानी मुघल सैन्याची रसद  आणि दळणवळण व्यवस्था विस्कळीत करुन मुघल सैन्याला सळो की पळो करुन सोडल्याने पेशवे दरबारात त्यांचा रुतबा वाढला.आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर इसवी सन १७२९ च्या सुमारास त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी मिळवली.पश्चिम माळव्याचा मोठा भाग व घोडदळाची सुत्रे त्यांना मिळाली.राणोजी शिंदे आणि उदाजी पवार यांच्यासोबत माळव्याची सुभेदारी समर्थपणे सांभाळीत होते.

  मल्हारराव होळकरांनी पाठीमागं वळून पाहिलंच नाही. त्यांनी आपली तलवार सातत्याने गनिमांवर तेवतच ठेवली.अनेक लढाया जिंकल्या.१७३२ पर्यंत होळकरनी माळव्यात जम बसवला.इसवी सन १७३३ मध्ये चौंडीच्या माणकोजी शिंदे यांची कन्या अहिल्याबरोबर पुत्र खंडेरावचा विवाह लावून देण्यात आला.  

  बाजीराव पेशवा आणि सरदार मल्हारराव होळकरांच्या पराक्रमाच्या जोरावर मराठा साम्राज्य विस्तारत होतं.उत्तरेत मुघलांचा अंमल होता.तिकंड मराठा फौजा घुसवायच्या आणि तिथं मराठ्याचां भगवा फडकावयाच बेत होता. उत्तरेची जबाबदारी सरदार मल्हारराव होळकरांवर दिली गेली.होळकरांनी आपल्या फौजा उत्तरेत घुसवल्या.इंदौर शहरावर कब्जा मिळवला.मुघलांना नेस्तनाबुत केलं आणि उत्तरेतील इंदौर भाग मराठ्याच्या साम्राज्यात आणला.

  इंदौरमध्ये सरदार मल्हारराव होळकरांचा दबदबा वाढला होता.मल्हार आया... मल्हार आया... म्हणलं की मुघल सैन्य नुसतं पळत सुटायचं

  मराठा साम्राज्य अबाधित राखण्यासाठी आणि साम्राज्याच्या

विस्तार वाढवण्यासाठी मल्हाररावांनी१७४७ मध्ये तिथं गनिमीकावा आणि मुत्सदेगीरीच्या जोरावर,उत्तर हिंदुस्थानातील राजकारणामध्ये मल्हाररावांचा मोठा दबदबा झाला होता. होळकरांचे व दोनहजार मराठे आणि त्यांचे सहकारी फिरोज जंग तिसरे यांनी सिकंदराबादच्या पहिल्या लढाईत १७५४ सालात मुघल सम्राट अहमद शाह बहादूरच्या शाही मुघल सैन्याचा पराभव केला. सम्राट आपली आई,पत्नी आणि आठ हजार महिलांना मागे सोडून दिल्लीला पळून गेला.याच सालात मल्हाररावावर काळाची क्रुर कूर्‍हाड कोसळली.

  १७ मार्च १७५४ भरतपूर संस्थानच्या जाट महाराजा सूरजमल विरुद्ध  कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा दिला होता.भर दुपारी खंडेराव छावणीतून बाहेर पडले आणि किल्ल्यावरून सोडलेल्या तोफेचा गोळा लागून त्यांना वीरमरण प्राप्त झाले.अहिल्याबाई सती जाण्यास निघाली असताना मल्हाररावांना तिचा विचार बदलण्यात यश आले.

 आपण राजा राममोहन राॅय यांनी सतीप्रथा रोखण्यासाठीच कार्य केल.इंग्रजांनी सतीप्रथा रोखली.अस आपणास सांगीतल जात.त्याच्या कितीतरी वर्ष अगोदर मल्हाररावांनी आपल्या सुनेला सती जाण्यापासुन रोखल.एवढच नव्हेतर,राजकारभारही शिकवला.

    १७६१ सालच्या पानीपतच्या युद्धात मराठ्याचा पराभव झाला. मात्र या लढाईमधून सुभेदार मल्हारराव होळकर पळून गेले असा त्यांच्यावर ठपका ठेवला जातो. मात्र काही इतिहासकारांच्या मते या युद्धात पराभव दिसू लागल्यामुळे सदाशिवराव पेशव्यांनी आपली पत्नी पार्वतीला सुरक्षित ठिकाणी नेण्याची जबाबदारी मल्हारराव होळकरांकडे सोपविली होती.

  पानिपतच्या पराभवानंतर मराठा साम्राज्याची घडी विस्कटली होती. ती बसवण्याचं काम माधवराव पेशव्यासोबत त्यांनी पुढाकारानं केलं. अनेक मोहिमा आखल्या.दगदग वाढली प्रकृती बिघडत गेली. त्यामुळे १७६६ रोजी आलमपुर येथे या पराक्रमी सरदाराला, शिवरायांच्या निष्ठावान मावळ्याला मृत्युनं गाठलं. २०मे १७६६ रोजी त्यांचा आलमपुर येथे मृत्यु झाला.त्यांच्या मृत्युनंतर त्यांचा नातु खंडेरावांचा तरुण मुलगा मलेराव होळकर इंदूरचा शासक बनला.दुदेॅवाने उचल खाल्ली १७६७ मध्ये काही महिन्यांतच त्यांचाही मृत्यू झाला.एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतर अहिल्याबाईंच्या खचल्या नाहीत तर, इंदूरच्या राज्यकर्त्या झाल्या.

   अहिल्याबाई होळकर यांनी मध्य प्रदेश राज्यातील भिंड जिल्ह्यातीलआलमपूर येथे त्यांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी त्यांची समाधी छत्रीबांधली.

 मल्हारराव यांना भारतावर मराठा साम्राज्य निमितीचे शिलेदार व नियंत्रणाचे शिल्पकार मानले जातात.मल्हाररावांनी अनेक युद्धे पाहिली. लाखो  रूपयांनी मराठा साम्राज्याची तिजोरी भरली. राजकारणाचे धागे दोरे उलगडले.

  शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याला निष्ठेच खतपाणी घालत जबाबदारीनं वाढवलं. मराठा साम्राज्याच्या सीमा सिंधू नदीपर्यंत वाढवल्या. मराठा साम्राज्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं, अशा धुरंधर, पराक्रमी, शुरवीर सरदारास आमचा मानाचा मुजरा!!!!

    या मराठा मावळ्यास विनम्र अभिवादन...!

✍🏻______चंदू चक्रवार भोकर



═════•*═════•❁❀❁•═════**═════•*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।।निर्णय क्षमता विकसित करा....।।

।।🟤 तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे,: 🟤