वारी समरसता रुजवणारी जीवनशाळा...

 🪔वारी;समरसता रुजवणारी जीवनशाळा *    🪔

——————————————————————

      वारी ही महाराष्ट्राची समृद्ग अशी हिंदू धर्मातली मनामनात समरसता,रुजवणारी सांस्कृतिक अन धामिॅक  परंपरा,ही महाराष्ट्राची ओळख,वारकरी संप्रदायातील वारीची परंपरा प्राचीन आहे. खुद्द संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या कित्येक वर्षे आधी वारीची परंपरा सुरु असल्याचे दाखले दिले जातात.केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून या वारीचे विराट स्वरूप पाहण्यासाठी भाविक-पर्यटक या काळात आवर्जून भेट देतात. अशा जगप्रसिद्ध वारीत आपण मनान सहभागी होवु या.

        हिंदु प्रथा,परंपरा,विधी,चालीरीती यांना बुरसटलेले,अंधश्रद्गाळु ठरवण्यात ज्यांची हयात गेली.ना त्यांची बाष्फळ,एकांगी बडबड थांबली ना त्यांच्या बूद्गीभेदाला समाज बळी पडला .या दोनही प्रक्रीया चिरंतन अव्याहतपणे चालुच आहेत.याला कारण हिंदुतत्वज्ञानातली वैचारीक बैठक यामुळे अगदी अमेरीकेच्या संसदेतही दिवाळी साजरी होते आहे.'सवेॅपि सुखिन सन्तु..सवेॅ सन्तु निरामया..'आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे..असा विश्वात्मकतेचा संदेश देणारा वारकरी पंथातली ही वारी म्हणजे हिंदू तवज्ञानाच विराट प्रकटीकरण.केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून या वारीचे विराट स्वरूप पाहण्यासाठी भाविक-पर्यटक या काळात आवर्जून भेट देतात.      महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबातील लाखो वारकर्‍यांना दरवर्षी आषाढाची चाहूल लागताच ओढ लागते ती पंढरीच्या वारीची.ते देहू आणि आळंदी ते पंढरपूर या आषाढी पालखीच्या मिरवणुकीत  हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी दिंड्या पताकासह वारीत कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो.पंढरपुरचा उल्लेख जगातील सर्वात मोठ्या तीर्थक्षेत्रांपैकी एक असा केला जातो. अशा जगप्रसिद्ध वारीच वर्णन संत नामदेवांच्या अमृतवाणीतुन,

   नामा म्हणे धन्य झाले ते संसारी । न सांडिती वारी पंढरीची ॥

     या अभंगात ज्ञानदेवांचे संत नामदेव महाराज म्हणतात, ''जे पंढरीची वारी चुकवीत नाहीत,ते संसारी धन्य होतात.'' संसार सोडून वा तुच्छ मानून परमार्थ करणाऱ्यांना संत नामदेव या अभंगातून संसार व परमार्थ दोन्ही सफल सुफल कसा करता येतो.याच वर्णन केल आहे.वारी म्हणजे काय तर आनंद, उत्साह,चैतन्य,उर्जा!

 पंढरीची वाट पाढे निरंतर निढळावरी कर ठेवूनिया

 जातिया निरोप पाठवी माहेरा 

का मज सामुग सांडियेले पैल कोण दिसे 

गरुडाचे वारिक विव्ठलासारिक चतुर्भुज 

तुका म्हणे धीर नाहीं माझ्या जीवा भेटसी केधवा पांडुरंगा

     वारीच वर्णन संतानी केलय.मला वाटत वारी हा जगातील चमत्कारच.

   आजच जग भौतिकसुखाकड झुकल आहे.आपणा सार्‍यांनाच ठाउक आहे.यात नव काहीच नाही.अशा युगातही शेकडो वर्षापुवीॅ निघालेली वारी टिकुन आहे.वारीला प्राचीन परंपरा आहे.भागवत धर्माचा प्रचार करण्यासाठी वारी सुरु झाली.वारी म्हणजे ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती,हरिनामाचा अखंड गजर,निस्सीम भक्तीच प्रकटीकरण,हे विश्वच माझे घर हा संदेश देण्यासाठीच वारी असते की काय?अस वाटायला लागते.

    मला तर,वारी हा चमत्कारच वाटतो. वारीला कोणतीही इव्हेंट मॅनेजमेंट वारीला असेस्ट करत नसत.कोणतेही इव्हेंट मॅनेजमेंट नाही. ही एक सामाजिक शक्ती आहे. कोणीही बोलावत नाही,कुणाला आमंत्रण नाही,निमंत्रण नसत ना कोणत्याही सोशल मिडीया, इलक्ट्राॅनिक मिडीया,प्रिंट मिडीया,फ्लेक्स लावुन जाहीरात कुणी लावत नसत.तरीपण सर्व सुरळीत पार पडते.वारीत कुठलीच भंपकबाजी,कसलही प्रलोभन नाही,कोणाचा कोणावर राग रुसवा करत नाही,कोणी कोणाला खायला घालेल की नाही,ते पण माहीत नसत,आज मला मिळालय उद्या मिळेल की नाही याची चिंताच नसते.खिशात एक रुपयाची नसला तरी पण त्यावाचुन अडतच नाही. तरीही संबंध कार्यक्रम निर्विघ्ण पार पडतो.कुणी वारी संयोजक नसत,प्रमुख नसत.वारीला कसलही गालबोट लागत नाही,जगभरात यापेक्षा मोठा सोहळा भरतच नाही,म्हणून कोठेच गर्वाचा,अहंकाराचा लवलेशही नसतो.वारी डोळ्याचं पारणफेडणारा,दैदिप्यमान,नेत्रदीपक सोहळा पाहिला की,अभिमानान उर भरून  येतो.

      वारी हा नुसता भक्तीसोहळा नव्हेतर,वारी समता आणू समरसतेतुन हा भाव मनामनात  रुजवते.हजारो वर्षापासुन मानवतेला काळीमा असलेल्या जातीभेदाच्या भक्कम भिंतीना ढासळवत सामाजीकच समतेचीच नव्हेतर,आथिॅक समतेची पताका फडकवत जाते. श्रीमंतच नाही तर,अत्यंत गरीबही वारीत सहभागी होतात.वारी म्हणजे,नुसत चालत पंढरपुर गाठण नसत.वारी म्हणजे,समता अन समरसतेचे मळे फुलवत सश्रद्ग ओढीन चालताना लहान-मोठा, गरीब-श्रीमंत सर्वजण सारखेच,वारीत कुणीच कुणाला नावाने न बोलवता ,सर्वांनाच समरसभावान  ‘माऊली’ म्हणून एकमेकांना संबोधत राग-लोभ, मद, मत्सर बाजूला ठेवून माणसात देवत्वाचा अविष्कार घडवत

 वारी समता अन समरसतेचे मळे फुलवत जाते.वारकर्‍यांची पावल सश्रद्ग ओढीन चालता चालता माणस,शेती,डोंगर,तळेमळे पाहत निसर्ग अनुभवायला शिकवते.बदलणारा निसर्ग,माणसानी केलेली वृक्षतोड,विकासकमासाठी पोखरलेली डोंगर,मूक्तहस्ते मानवाने केलेली निसर्गाची लयलुट अनुभवतो.बदलणारा समाज,निसर्ग पाहतो,माणसांची सुखदु:खे समजुन घेतो.वारीत मदतीचा हात पुढे करत सहकार्याची भावना मनात रुजते,आपल्याकडून ईश्वर हे सर्व करून घेत असतो.आपण केवळ निमित्त मात्र आहोत अशा भावनांच बीज मनात रुजतानाच अहंकाराच तण काढत जाते. वारीत विठ्ठलाच्या ओढीने त्याला भेटायला जायचे एवढच नसते. वारी ही समरसता रुजवणारी ही जणु जीवनशाळाच!

   गर्भश्रीमंत सोहळा कुबेराच्या श्रीमंतीला देखील लाजवणारी श्रीमंती वारीत दिसते.म्हणून मी म्हणतो एकदा तरी वारी अनुभवावी. 

चला पंढरीसी जाऊं ।  रखमादेवीवरा पाहूं ॥ 

  डोळे निवतील कान । मना तेथें समाधान ॥  

   संता महंता होतील भेटी । आनंदे नाचों वाळवंटी ॥ 

     तें तीर्थांचे माहेर । सर्व सुखाचें भांडार ॥

या ओवी प्रमाणे प्रत्येकाचीच "भेटी लागी जीवा ..पंढरीची वारी अनुभवण्याची  इच्छा असते. 

______चंदू चक्रवार भोकर

—————————————————————

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।।निर्णय क्षमता विकसित करा....।।

।।🟤 तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे,: 🟤